1
|
“गडगडाट व वीजा ह्यांची मला भिती वाटते. तेव्हा माझ्या ह्दयाची धडथड वाढते. |
2
|
प्रत्येक जण लक्षपूर्वक ऐका! देवाचा आवाज गडगडाटासारखा वाटतो. देवाच्या मुखातून येणारा गडगडाटासारखा आवाज ऐका. |
3
|
देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो. ती सर्व पृथ्वीभर चमकते. |
4
|
वीज चमकते तेव्हा देव गडगडाटी आवाज काढतो. देव त्याच्या अद्भुत आवाजात गर्जतो. वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते. |
5
|
“देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे. देव आपल्याला न काळणाऱ्या महान गोष्टी करत असतो. |
6
|
देव ‘हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो.’ देव ‘पावसाला पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’ |
7
|
देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांना तो काय करु शकतो हे कळावे म्हणून देव या गोष्टी करतो हा त्याचा पुरावा आहे. |
8
|
पशू त्यांच्या घरकुलात जातात आणि तेथेच राहतात. |
9
|
दक्षिणेकडून चक्रीवादळ येते. उत्तरेकडून थंड वारे येतात. |
10
|
देवाच्या नि:श्वासाने बर्फ होते आणि समुद्र गोठतो. |
11
|
देव ढगांना पाण्याने भरतो आणि तो ते पसरवतो. |
12
|
तो ढगांना सर्व पृथ्वीभर पसरण्याची आज्ञा करतो. देव जी आज्ञा देती ती ढग पाळतात. |
13
|
देव लोकांना शिक्षा करण्यासाठी ढग आणतो, पूर आणतो किंवा त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी पाणी आणतो. |
14
|
“ईयोब, एक क्षणभर थांब आणि लक्ष दे. थांब आणि देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्यांचा विचार कर. |
15
|
ईयोब, देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का? तो विजेला कसे चमकावितो ते तुला माहीत आहे का? |
16
|
ढग आकाशात कसे तरंगतात ते तुला कळते का? देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याचे ढग हे केवळ एक उदाहरण आहे. आणि देवाला त्याबद्दल सारे माहीत आहे. |
17
|
परंतु ईयोब तुला या गोष्टी माहीत नाहीत. तुला फक्त एवढेच माहीत आहे की दक्षिणेकडून गरम वारे वाहतात तेव्हा तुला घाम येतो, तुझे कपडे अंगाला चिकटतात आणि सगळे काही स्तब्ध असते. |
18
|
ईयोब, तू देवाला आकाश पसरवण्यात आणि ते आरशाप्रमाणे करण्यात मदत करु शकशील का? |
19
|
“ईयोब, देवाला आम्ही काय सांगायचे ते तू आम्हांला सांग. काय बोलावे ते आम्हाला कळत नाही कारण आम्हाला जास्त माहिती नाही. |
20
|
मला देवाशी बोलायचे आहे असे मी म्हणणार नाही. तसे म्हणणे म्हणजे स्वत:चा नाश करुन घेणे आहे. |
21
|
माणूस सूर्याकडे बघू शकत नाही. वाऱ्याने ढग पळवून लावले की तो फार तेजस्वी आणि चकचकीत दिसतो. |
22
|
आणि देवसुध्दा तसाच आहे. देवाची सुवर्णप्रभा दक्षिणेकडील पर्वतावरुनचमकते. देवाच्या भोवती तेजोवलय असते. |
23
|
तो सर्वशक्तिमान देव महान आहे. आपण त्याला समजू शकत नाही. तो सामर्थ्यवान आहे. परंतु तो आपल्याशी चांगला आणि न्यायाने वागतो. देवाला आपल्याला त्रास द्यायची इच्छा नसते. |
24
|
म्हणूनच लोक देवाला मान देतात. परंतु देव आपल्या शहाणपणाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना मान देत नाही.” |
Job 37:9 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...