1
|
नंतर ईयोबने बिल्ददला उत्तर दिले: |
2
|
“बिल्दद, सोफर आणि अलीफज तुम्ही दुर्बल माणसासाठी खूप मोठे साहाय्य आहात. हो तुम्हीच दुबळ्या हातांना पुन्हा जोमदार बनवले. (हे ईयोबचे बोलणे उपरोधक आहे) |
3
|
“विद्वत्ताहीन माणसाला तुम्ही फार चांगला उपदेश केला. तुम्ही किती विद्वान आहात ते तुम्ही दाखवून दिलेत. |
4
|
हे बोलण्यासाठी तुम्हाला कुणाची मदत मिळाली? कुणाच्या आत्म्याने तुम्हांला याची प्रेरणा दिली? |
5
|
“मेलेल्या माणसाचा आत्मा भयाने पृथ्वीच्या खाली पाण्यात घाबरतो. |
6
|
परंतु देव मृत्युलोकात स्वच्छपणे बघू शकतो. मृत्यु देवापासून लपून राहात नाही. |
7
|
देवाने रिकाम्या पोकळीत दक्षिणेकडचे आकाश सरकवले. देवाने पृथ्वी निराधार टांगली, अधांतरी ठेवली. |
8
|
“देव घनदाट ढगांना पाण्याने भरतो. परंतु त्या वजनाने तो ढगांना फुटू देत नाही. |
9
|
देव पूर्ण चंद्राचा चेहरा झाकून टाकतो. तो त्याच्यावर ढग पसरवतो आणि त्याला लपवतो. |
10
|
देवाने सागरावर एक वर्तुळ आखले आणि प्रकाश काळोखापासून वेगळा करण्यासाठी क्षितिज निर्माण केले. |
11
|
देव जेव्हा धमकी देतो तेव्हा आकाशाला आधार देणारा पाया भयाने थरथरायला लगतो. |
12
|
देवाची शक्ती सागराला शांत करते. देवाच्या विद्वत्तेने राहाबाच्या मदतनीसांना नष्ट केले. |
13
|
देवाचा नि:श्वास आकाश स्वच्छ करतो. देवाच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले. |
14
|
देव ज्या काही अनामिक गोष्टी करतो त्यापैकी या काही गोष्टी आहेत. आपण देवाची एखादी लहानशी कुजबुज ऐकतो, देव किती सामर्थ्यवान आणि शक्तिशाली आहे. हे कोणालाच कळत नाही.” |
Job 26:3 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...