1
|
नंतर ईयोबने उत्तर दिले: |
2
|
“तरीही मी आज कडवटणे तक्रार करीन. का? कारण मी अजूनही दु:खी आहे. |
3
|
देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असेत तर किती बरे झाले असते. देवाकडे कसे जावे ते मला कळते तर किती बरे झाले असते. |
4
|
मी देवाला माझी कथा सांगितली असती. माझा निरपराधीपणा सिध्द करण्यासाठी मी सतत वाद घातला असता. |
5
|
देवाने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते तर किती बरे झाले असते. मला देवाची उत्तरे समजून घ्यायची आहेत. |
6
|
देव माझ्याविरुध्द त्याच्या सामर्थ्याचा उपयोग करेल का? नाही. तो मी काय म्हणतो ते ऐकेल. |
7
|
मी सत्यप्रिय माणूस आहे. देव मला माझी गोष्ट सांगू देईल. नंतर माझा न्यायाधीश मला मुक्त करील. |
8
|
“पण मी जर पूर्वेकडे गेलो, तर देव तेथे नसतो. मी पश्र्चिमेकडे गेलो तर तिथेही मला देव दिसत नाही. |
9
|
देव दक्षिणेत कार्यमग्र असला तरी मला तो दिसत नाही. देव जेव्हा उत्तरेकडे वळतो तेव्हाही तो मला दिसत नाही. |
10
|
परंतु देवाला मी माहीत आहे. तो माझी परीक्षा घेत आहे. आणि मी सोन्यासारखा शुध्द असेन याकडे तो लक्ष पुरवेल. |
11
|
मी नेहमीच देवाच्या इच्छेनुसार जगत आलो आहे. आणि मी त्याचा मार्ग चोखाळणे कधीच थांबवले नाही. |
12
|
मी त्याच्या आज्ञेचे पालन केले. मी माझ्या अन्नापेक्षा देवाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर अधिक प्रेम करतो. |
13
|
“परंतु देव कधी बदलत नाही. देवासमोर कुणीही उभा राहू शकणार नाही. देव त्याला हवे ते करु शकतो. |
14
|
माझ्या बाबतीत देवाने जे योजिले आहे तेच तो करेल. माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत. |
15
|
म्हणूनच मी देवाला भितो. मी या गोष्टी समजू शकतो आणि म्हणून मला देवाची भीती वाटते. |
16
|
देव माझे हृदय कमजोर बनवतो आणि मी माझे धैर्य गमावून बसतो. सर्वशक्तिमान देव मला घाबरवतो. |
17
|
माझ्या बाबतीत ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या माझ्या चेहऱ्यावरच्या काळ्या ढगाप्रमाणे आहेत. परंतु तो काळोख मला गप्प बसवू शकणार नाही. |
Job 23:9 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...