1
|
नंतर इसहाकाने याकोबाला बोलावून त्याला आशीर्वाद दिला नंतर त्याने त्याला बजावून आज्ञा दिली; तो म्हणाला, “तू कनानी मुलीपैकी कोणत्याच मुलीशी लग्न करता कामा नये; |
2
|
तेव्हा तू आता येथून नीघ, व पदल अरामात बथुवेल तुझ्या आईचे वडील बथुवेल याच्या कडे जा. तुझ्या आईचा भाऊ लाबान तेथे राहातो आणि त्याच्या मुलीपैकीच एकीशी लग्न कर. |
3
|
मी सर्वसमर्थ देवयाची प्रार्थना करतो की त्याने तुला आशीर्वादित करावे; आणि तुला खूप मुले द्यावीत तू महान राष्ट्राचा पिता व्हावे अशी प्रार्थना करतो. |
4
|
तसेच परमेश्वराने अब्राहामाला व त्याच्या संततीला जसा आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद त्याने तुला व तुझ्या संततीलाही द्यावा अशी मी प्रार्थना करतो; आणि मी आणखी अशी ही प्रार्थना करतो की जो हा देश परमेश्वराने अब्राहामाला दिला व ज्यात तू राहातोस त्या देशाचा त्याने तुला मालक करावे.” |
5
|
अशी रीतीने इसहाकाने याकोबाला पदन अराम येथे पाठवले; तेव्हा याकोब पदन अराम येथील अरामी बथूवेलाचा मुलगा व आपली आई रिबका हिचा भाऊ, लाबान याच्याकडे गेला. |
6
|
एसावाला कळले की आपला बाप इसहाक याने याकोबला आपला आशीर्वाद दिला, व याकोबाने कोणत्याच कनानी स्त्रिशी लग्न करु नये अशी आज्ञा दिली, तसेच बायको शोधण्यासठी त्याने याकोबाला पदन अराम येथे पाठवून दिले; |
7
|
आणि याकोबही आपल्या आईबापाची आज्ञा मानून पदन अरामास गेला ह्या ही गोष्टी एसावास कळाल्या; |
8
|
या सर्व गोष्टींवरुन आपल्या बापाला आपल्या मुलांनी कोणत्याच कनानी मुलीशी लग्न करु नये असे वाटते हे एसावाला उमगले |
9
|
एसावाला अगोदरच दोन कनानी बायका होत्या, म्हणून तो इश्माएलाकडे गेला आणि त्याने आणखी एका स्त्रीशी म्हणजे इश्माएलाची मुलगी महलथ हिच्याशी लग्न केले, इश्माएल अब्राहामाचा मुलगा होता आणि महलथ नबायोथाची बहीण. |
10
|
याकोबाने बैर - शेबा सोडले व तो हारानाला गेला; |
11
|
प्रवास करताना सूर्य मावळला म्हणून त्याने एके जागी रात्रीं मुक्काम केला; तेथे रात्रीं झोंपताना त्याला एक धोंडा दिसला तो उशास घेऊन तो रात्रीं तेथेच झोंपला; |
12
|
तेव्हा त्याला एक स्वप्न पडले; स्वप्नात एक उंच शिडी आहे, तिचे एक टोक जमिनीवर व दुसरे टोक वर स्वर्गापर्यंत पाहोचलेले आहे असे त्याने पाहिले; |
13
|
याकोबाने पाहिले की देवदूत शिडीवर चढत व उतरत आहेत. शिडीवरती परमेश्वर उभा असल्याचे त्याला दिसले; परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे आजोबा अब्राहाम व तुझे वडील इसहाक यांचा मी परमेश्वर व देव आहे; तू ज्या भूमिवर झोंपला आहेस ती भूमि म्हणजे तो देश मी तुला व तुझ्या वंशजांना देईन |
14
|
तसेच मी तुला भरपूर वंशज देईन; तुझे वंशज पृथ्वीवरील मातीच्या कणाइतके अगणित होतील; ते उत्तर व दक्षिण, पूर्व व पश्चिम या दिशांकडील देशात पसरतील; तुझ्यामुळे व तुझ्या वंशजांमुळे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील. |
15
|
“मी सतत तुझ्याबरोबर आहे आणि तू ज्या ज्या ठिकाणी जाशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझे रक्षण करीन आणी तुला या देशात परत आणीन; मी हे माझे वचन पूर्ण करीपर्यंत तुला अंतर देणार नाही.” |
16
|
मग याकोब झोपेतून जागा झाला व म्हणाला, “खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे हे मला समजले आहे; परंतु झोंपून उठेपर्यंत ते मला कळले नाही.” |
17
|
याकोबाला भीती वाटली, तो म्हणाला, “हे फार महान ठिकाण आहे, हे देवाचे निवासस्थान, त्याचे घर व स्वर्गाचे दार आहे.” |
18
|
याकोब पहाटे लवकर उठला; त्याने उशास घेतलेला धोंडा एका टोकावर उभा करुन जमिनीत रोवला; मग त्याने त्यावर तेल ओतले. अशा प्रकारे त्याने त्या धोंड्याचे देवाचे स्मारक केले. |
19
|
त्या ठिकाणाचे नाव लूज होते परंतु याकोबाने त्याचे नाव बेथेल ठेवले. |
20
|
मग याकोबाने शपथ वाहून नवस केला; तो म्हणाला, “जर देव माझ्याबरोबर राहील; आणि जेथे जेथे मी जाईन तेथे तो माझे रक्षण करील; आणि जर तो मला खावावयास अन्न व ल्यावयास वस्त्र पुरवील; |
21
|
आणि जर मी शांतीने माझ्या बापाच्या घरी परत येईन जर देव या सर्वगोष्टी करील तर मग तो माझा परमेश्वर होईल; |
22
|
मी हा धोंडा या ठिकाणी स्मारकस्तंभ म्हणून उभा करुन ठेवतो, त्यावरुन परमेवराकरिता हे पवित्र ठिकाण आहे असे दिसेल आणि देवाने मला दिलेल्या सर्वाचा दशांश म्हणजे दहावा भाग मी देवाला अर्पण करीन.” |
Genesis 28:2 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...